चामोर्शीतील तीन गावांमध्ये ‘रन फॉर मुक्तिपथ मॅरेथॉन दौड स्पर्धा’

236

– ११५ जणांनी घेतली दारूमुक्तीची मशाल
The गडविश्व
गडचिरोली, २७ डिसेंबर : अवैध दारूविक्री विरोधात लढा देण्यासाठी गावातील महिला, पुरुषांसह युवक-युवतींना एकत्रित करण्याच्या उद्देशाने चामोर्शी तालुक्यातील वाघोली, कुथेगाव व इरईटोला येथे ‘रन फॉर मुक्तिपथ मॅरेथॉन दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून तिन्ही गावातील एकूण ११५ जणांनी हातात दारूमुक्तीची मशाल घेऊन अवैध दारूविक्रीमुक्त गाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले.
वाघोली येथे २५० ग्रामस्थांच्या उपस्थितीत रन फॉर मुक्तिपथ मॅरेथॉन दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये गावातील महिला, पुरुष, युवक , युवती अशा एकूण ४५ खेळाडूंनी सहभाग घेत गाव व्यसनमुक्त करण्याचा संकल्प घेतला. कुथेगाव येथील स्पर्धेसाठी २०० गावकऱ्यांनी उपस्थिती दर्शविली तर ३६ स्पर्धकांनी सहभाग घेतला. इरईटोला या स्पर्धेतून १५० ग्रामस्थांच्या उपस्थितीत ३४ स्पर्धकांनी खेळ प्रदर्शन केले. या तिन्ही गावांमध्ये पार पडलेल्या स्पर्धांच्या माध्यमातून एकूण ११५ जणांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, स्पर्धेचे रूपांतर सभेत करून अवैध दारू व तंबाखूविक्री विरोधी असलेल्या कायद्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. सोबतच दारुबंदीशिवाय गावाचा विकास शक्य नसल्याचे पटवून देण्यात आले. तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या स्पर्धकाला मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन मुक्तीपथ उपसंघटक आनंद सिडाम व स्पार्क कार्यकर्ती प्रियंका भुरले यांनी केले.
(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Salman Khan) (David Warner) (Steve Smith) (Sandeep Sharma) ( Chelsea vs Bournemouth ) (Road Accident) (DHanora) (Muktipath)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here