Runway Walk Title Of India TV Reality Show 2022 विजेत्या सौ.मनीषा मडावी यांचे आज गडचिरोली शहरात आगमन व सत्कार

336

– शहरातील इंदिरा गांधी चौकात मान्यवरांच्या हस्ते जंगी स्वागत व सत्कार

The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील सौ.मनीषा जगदीश मडावी यांनी नुकतेच Runway Walk Title Of India TV Reality Show 2022 हा ‘किताब जिंकून देशपातळीवर गडचिरोली जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. सौ.मनीषा जगदीश मडावी यांचे आज १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान गडचिरोली शहरात आगमन होत असून मान्यवरांच्या हस्ते जंगी स्वागत व सत्कार करण्यात येणार आहे.
30 जानेवारी रोजी पुणे येथील WE हॉटेल येथे Runway Walk Title Of India TV Reality Show 2022 घेण्यात आला. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातून सौ.मनीषा जगदीश मडावी, कु. कृष्‍णा वासुदेव खडसे, कु. काव्या खुमेंद्र मेश्राम, कु. आर्या नरेश बिडकर, कु. अनुष्का नरेश बिडकर, सिद्धेश खुशाल मुनघाटे,कु. यशश्री विनोद वंजारी, आरुष उत्तमराव मेहेरे यांनी ऑडिशन देऊन थेट ग्रॅण्ड फिनाले मध्ये पोहचत वेगवेगळ्या प्रतियोगितामध्ये यशस्वीरित्या विजय संपादन करून गडचिरोली जिल्ह्याचे नाव देशपातळीवर रियालिटी नॅशनल टीव्ही शो च्या माध्यमाने पोचविले. यामध्ये सौ. मनीषा जगदीश मडावी यांनी मिसेस कॅटेगिरी मधून Runway Walk Title of India TV Reality Show 2022 जिंकून टायटल आपल्या नावे केले.
पुणे येथून आज Runway Walk Title Of India TV Reality Show 2022 विजेत्या सौ. सौ.मनीषा मडावी यांचे गडचिरोली शहरात सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान आगमन होत आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा जंगी स्वागत व सत्कार शहरातील इंदिरा गांधी चौकात करण्यात येणार आहे.
पुणे येथील प्रतियोगितेत Teen कॅटेगिरी कु. आर्या डॉ नरेश बिडकर यांनी Runway Walk Title Of India TV Reality Show 2022 जिंकून 3rd Runner Up Title प्राप्त केले. कु.क्रिष्णा वासुदेव तडसे यांनी Miss Category मध्ये Runway Walk Title Of India TV Reality Show 2022 मध्ये Miss Most Beautiful Eyes जिंकून Title प्राप्त केले. कु काव्या खुमेंद्र मेश्राम यांनी Kids Category मध्ये Kids Best Walk Winner जिंकून Title आपल्या नावे केली. कु अनुष्का डॉ नरेश बिडकर यांनी Teen Category मध्ये Teen Beautiful Eyes जिंकून Title आपल्या नावे केले. तर कु. यशश्री विनोद वंजारी यांनी Miss कॅटेगिरी मध्ये Most Glorious Face जिंकून टायटल आपल्या नावे केली. तर Kids कॅटेगिरी मध्ये आरुष उत्तमराव मेहेरे यांनी Kids Talented Winner जिंकून Title आपल्या नावे केला. सिद्धेश खुशाल मुनघाटे यांनी Mr Category मध्ये सहभागी होऊन Mister Best Personality Winner जिंकून Title आपल्या नावे करून आता National television TV Reality Show मध्ये याचे प्रक्षेपण होणार आहे. Runway walk Title Of India TV Reality Show 2022 प्रतियोगिता जिंकून आलेल्या सर्व स्पर्धकांवर गडचिरोली वासीयांकडून शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here