The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १० फेब्रुवारी : येथील जुने दैनिक तरुण भारत प्रतिनिधी तथा जेष्ठ नागरिक शिवराम धांडुजी चिमुरकर यांचे गुरुवार १० फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १.३० वाजता अल्प आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७८ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना आणि नातवंड येवढा आप्त परिवार असुन चिमुरकर परिवारावर शोककळा पसरलेली आहे. त्याच्या पारथीवावर उद्या शनिवार ११ फेब्रुवारीला सकाळी धानोरा येथे अंत्यसंसकार करण्यात येणार आहे.