The गडविश्व
ता. प्र /धानोरा, दि. ०६ : येथील जे.एस.पि.एम. काँलेजचे प्राध्यापक डॉ. राजू पुंडलिक किरमिरे यांची आई ताराबाई पुंडलिक किरमिरे यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी आज गुरुवार ६ जून २०२४ रोजी आरमोरी येथील राहत्या घरी दुपारी २.०० वाजता अल्प आजाराने दुःखद निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या पश्चात एक मुलगा आणि तिन मुली आणि नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे.
त्यांच्यावर उद्या शुक्रवार ७ जून २०२४ ला सकाळी ०९.३० वाजता आरमोरी येथील गाढवी नदिवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.