शिवाजी हायस्कूल कुरखेडा ची सायली गाडेगोने तालुक्यातून व्दितीय

189

The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. २७ : श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली व्दारा संचालित शिवाजी हायस्कूल कुरखेडा चा इयत्ता १० वी चा निकाल ९३.३८ टक्के लागला असून २७ विद्यार्थी प्रविण्याप्राप्त श्रेणीत उत्तीर्ण झाले तर ६१ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत.
कु.सायली सितकुरा गाडेगोने हि ९३.४० टक्के गुण घेऊन कुरखेडा तालुक्यातून व्दितीय तसेच शिवाजी हायस्कूल कुरखेडा या शाळेतून प्रथम आलेली आहे तर कु.श्रद्धा किसान अंबादे हि ९१.२० टक्के गुण घेऊन विद्यालयातून व्दितीय आलेली आहे व कु.मयुरी यादव बाळबुद्धे हि ८७.६० टक्के गुण घेऊन विद्यालायामधून तृतीय आली , कु.मंतशा सिराज पठाण हि ८६.६० टक्के गुण घेऊन विद्यालायामधून चौथी आलेली आहे , कु.उर्वशी शुद्धोधन सहारे व होमराज राजकुमार ढोरे यांनी संयुक्तपने ८५.४० टक्के गुण घेऊन विद्यालायामधून पाचव्या क्रमांकावर आलेले आहेत .
तसेच विद्यालायामधून कु.टिनूताई शरद पवार हिला ८४.२० टक्के गुण, कु.भूमिका सुरेश देशमुख ८४.२० टक्के गुण, कु.वेदिका प्रमोद राखडे ८४.०० टक्के गुण, कु.नंदिनी सुनील डोंगरवार ८२.८० टक्के गुण, कु.तन्वी रेवनाथ लांजेवार हि ८१.०० टक्के गुण प्राप्त केले .
या निकालाबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार यांनी समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांनी आपल्या पुढील वाटचालीस सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन उच्च शिक्षणाची कास धरावी, आपला व आपल्या कुटुंबाचा व शिवाजी हायस्कूल कुरखेडा चे नाव लौकिक करावा असे मत व्यक्त केले व गुणवंत विद्यार्थी व पालकांचे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
यावेळी सत्कार समारंभाला कुरखेडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सिराज पठाण तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक सितकुरा गाडेगोने , किसन अंबादे , यादव बाळबुद्धे , शुद्दोधन सहारे हे उपस्थित होते .
शिवाजी हायस्कूल कुरखेडा येथील यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, गडचिरोली चे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री, संस्थेचे सचिव गोविंदराव बानबले व शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा चे शाळा समिती अध्यक्ष अरुण पाटील मूनघाटे तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार व विद्यालयाचे पर्यवेक्षक किशोर कोल्हे, उद्धव वाघाडे, चंद्रकांत नरुले, नोगेश गेडाम, लीकेश कोडापे, महेंद्र नवघडे, निखील कसबे, कालिदास सोरते, स्वप्नील खेवले, रुपेश भोयर विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक अनिल बांबोळे, कनिष्ठ लिपिक लोकेश राऊत, शिवा भोयर, घनश्याम भोयर व सर्व शिक्षकांना दिले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #sscexam #sscresult2024)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here