– टाळ मृदंगाच्या गजराने ढाणकी नगरी दुमदुमले
The गडविश्व
प्रतिनिधी / ढाणकी (प्रवीण जोशी) १० मार्च: शहरात गुरुवार ९ मार्च रोजी समस्त वारकरी बांधवांचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचे बीजे निमित्त सर्व वारकरी बांधवानी मोठ्या उत्साहाने, व आनंदाने तुकाराम महाराज बीज साजरी केली.
यावेळी ढाणकी शहरातून भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली होती. शहरातील सर्व वारकरी बांधव, प्रतिष्ठित नागरिक, युवा वर्ग, लहान चिमुकले व महिलांचा मोठा सहभाग शोभायात्रेत दिसून आला. टाळ मृदंगाच्या गजराने ढाणकी नगरी दुमदुमून गेली होती. शहरातील भजनी मंडळांनी या ग्राम प्रदक्षिणेमध्ये विशेष सहभाग घेऊन शोभा यात्रेत अधिकच सुबकता वाढवली. टाळ- मृदंगाचा गजर, रिक्षांवर विविधरंगी फुले आणि लाईटच्या माळांची सजावट, रस्त्यावर काढलेल्या रांगोळीच्या पायघड्यांवरून शेकडो शहरवासीयांच्या उपस्थितीत संपूर्ण शहरातून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचा फोटो लावून अतिशय शांतपणे शोभायात्रा काढली गेली व स्थानिक वारकरी बांधवांनी ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिरात ह.भ. प. अनंत महाराज कनवाळे यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला ह.भ.प डॉ लक्ष्मीकांत रावते महाराज, संजय देवधर, दत्तात्रय दर्शनवाड, दिगंबर नलगे, नामदेव महाजन व समस्त वारकरी बांधवांचे सहकार्य लाभले.
(The Gadvishva) (Gadchiroli) (Dhanki) (The gdv) (Tukaram Bij)