The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २३ : तालुक्यातील एरंडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रविवार २२ डिसेंबर रोजी समता सैनिक दलाची स्थापना व शाखा उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात समता सैनिक दलाचे ध्वजारोहण अभिमन्यू बनसोड कार्याध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी अधिकारी संजयजी रामटेके, उद्घाटक किशोरजी सरदारे, प्राध्यापक मुनिश्वर बोरकर, मुख्याध्यापक गिरधरजी सिंद्राम, तेजरामजी जनबंधू, भास्करजी सहारे, प्रल्हादजी लाडे, जयश्री लाडे, रवींद्रजी जांभुळकर, देवानंद जनबंधू, कुसनजी हीळको, पोलीस पाटील चोखोबाजी साखरे, सरपंच संतोषजी हिचामी, प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संजयजी रामटेके यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उर्वरित कार्य समता सैनिक दलच करू शकते. त्यासाठी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी एकजूट दाखविणे महत्त्वाचे आहे. ज्या ज्या ठिकाणी आपल्यावर अन्याय होत असेल त्या त्या ठिकाणी समता सैनिक दलाचे पुढाकार घेऊन कार्य करावे व गावागावात समता सैनिक दलाचे शाखा निर्मित झाले पाहिजेत. याप्रसंगी किशोरजी सरदारे, प्राध्यापक मुनिश्वरजी बोरकर, मनोज अंबादे, ललिता चौधरी, यांनी सुद्धा योग्य मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालक पुरुषोत्तमजी जनबंधू, प्रास्ताविक पुरुषोत्तम भैसारे तर आभार सौ. राजश्री शालिक साखरे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी, कैलास नंदेश्वर, शालिक साखरे, भारत नांदेश्वर, मंगेशजी भानारकर, खेळदास नांदेश्वर, जिवन भैसारे, प्रमोद जनबंधू, कुसन नंदेश्वर, तसेच येरंडी परिसरातील समता सैनिक दलाचे सर्कल कमांडर समर्थजी सहारे ह्यांनी सहकार्य केले.
तसेच कार्यक्रमाला समता सैनिक दलाचे कार्यकर्ते बहुसंखेने उपस्थिती होते.