The गडविश्व
ता.प्र /कुरखेडा, दि. ०२ : तालुक्यातील जि.प.उच्च प्राथमिक शाळा गेवर्धा येथे शाळा व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी ०२ मार्च रोजी गठीत करण्याबाबद ग्रा.पं. सदस्य रोशन सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्षपदी संदीप कुमरे तर उपाध्यक्ष सौ. माधुरी शेन्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन राजु बारई अध्यक्ष तंटामुक्त समिती, सौ.रुबीनाताई सय्यद माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, अमित पाकमोळे माजी उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती उपस्थित होते.
दरम्यान शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संदीप कुमरे तर उपाध्यक्षपदी सौ.माधुरी नितीन शेंडे यांची निवड झाली. तर सदस्य म्हणुन विलास कुथे, हर्षवर्धन मडावी, मदन शेंडे, ओमप्रकाश रामटेके, जगदीश वट्टी, मयूर चन्ने, निराशा वट्टी, वनिता बोदेले, ममता धांडे, विना विठ्ठल उईके, सुलताना शकील शेख, मुख्याध्यापक कुळमेथे, शिक्षक प्रतिनिधी म्हणुन दखणे यांची निवड करण्यात आली.
सदर समिती निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध करण्यात आली. याप्रसंगी बहुसंख्येने पालकवर्ग उपस्थित होते.