The गडविश्व
अमिर्झा,२६ नोव्हेंबर : तालुक्यातील ग्रामपंचायत अमिर्झा येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.
संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून संविधान दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी अनिल खेवले, उपसरपंच संदीप भैसारे, ग्रा.पं.सदस्य अजय नागपूरे, लिपिक दिलीप गजबे, ग्रा.पं शिपाई मनोहर सावसाकडे तसेच कंत्राटदार भुरसे, कंत्राटदार प्रेमचंद धाकडे, चंद्रशेखर नन्नावरे व गावातील नागरिक उपस्थित होते.