The गडविश्व
ता. प्र /. कुरखेडा, दि. ३१ : आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था गेवर्धा येथील पंचवार्षिक निवडणूकीत पोरेड्डीवार सावकार गटाने वर्चस्व कायम ठेवत लढतीत १३ पैकी १० जागेवर विजय मिळविला तर विरोधी शेतकरी विकास गटाला फक्त ३ जागेवर समाधान मानावे लागले. ह्या विजयी बद्दल सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेड्डीवार आणि आ. कृष्णा गजबे ह्यानी सर्वांचे अभिनंदन केले.
मंगळवार ३० जूलै रोजी सकाळी ९ ते सांयकाळी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली यानंतर लगेच मतमोजणी करीत सांयकाळी ७ वाजता निकाल घोषित करण्यात आला. यावेळी चुरशीचा लढतीत बिगर आदिवासी कर्जदार गटातून गटनेते व्यंकटी नागीलवार व मानिक गायकवाड यांनी विजय मिळविला तर सर्वसाधारण आदिवासी कर्जदार गटातून शिवलाल कवडो, सिताराम गावळे, तूकाराम नहामूर्ते, अनिराम बोगा व देवनाथ मरस्कोल्हे यांनी तर विरोधी शेतकरी विकास गटाचे प्रभाकर कूळमेथे यानी विजय मिळविला. अनूसूचित जाति जमाती गटातून परसराम लाडे व महिला राखीव गटातून शामलता आळे व रूपाली पूसाम यांनी विजय संपादन केला तर इतर मागास प्रवर्ग गटातून विरोधी शेतकरी विकास गटाचे सूधिर बाळबूद्धे तर भटक्या विमूक्त जाती जमाती गटातून जनार्धन डोगंरवार हे विजयी ठरले.
या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी श्रेणी १ सूशिल वानखेडे यांनी जवाबदारी पार पाडली. तर संस्थेचे व्यवस्थापक रामदास मस्के यांनी सहकार्य केले. विजयाची घोषणा होताच जिल्हा बैंकेचे संचालक खेमनाथ पाटील डोंगरवार, गटनेता व्यंकटी नागीलवार, देवानंद पा खुणे, मधूकर शेंडे, जावेद शेख, ॲड. उमेश वालदे, बंडू पा खुणे, मंगेश कराडे, उपसरपंच, निजामुद्दीन शेख, डॉ टेंभुर्णे, अनिल बुद्धे,होमेश ठेलकर,श्रीहरी कांबळे,नरेश पूसाम,जीवन पर्वते,अशोक नखाते, यादव नाकतोडे, असुलाल पालीवाल, वासुदेव कुथे, सीताराम गायकवाड, मोतीराम उईके, सीताराम ऊइके, फगुजी तुलावी, केशव कवडो, उदाराम गावळे, श्रीकांत नागिलवार, नितीन कुथे, गुलाब मस्के, भाग्यरेखा वझाडे यांचा नेतृत्वात विजय उत्सव साजरा करण्यात आला.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #kurkheda )