The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १७ जुलै : तालुक्यातील दुर्गम व आदिवासी बहुल अशा सावरगाव येथे गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने पोलिस अधिक्षक नीलोत्पल, अप्पर पोलिस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून व धानोरा चे उपविभागीय पोलिस अधिकारी मयूर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली १५ जुलै रोजी सावरगाव पोलिसांनी भव्य कृषी मेळाव्याचे आयोजन केले होते. यामध्ये हद्दीतील लोकांना विविध शेतीउपयोगी ग्रहउपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सीआरपीएफ चे अजयकुमार लकडा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एसआरपीफ चे पी आय बायस व हद्दीतील गावाचे प्रतिष्ठित नागरिक होते.
प्रभारी अधिकारी प्रकाश लोखंडे यांनी प्रास्ताविक केले त्यामध्ये त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक शेती विषयी मार्गदर्शन केले व पारंपरिक शेती सोबत शेतीला जोड धंद्याची गरज असल्याचे सांगितले. यामधे पोलिस दादालोरा खिडकीच्या वतीने वेळोवेळी मत्स्यपालन, शेळीपालन, भाजीपाला लागवड यासारखे प्रशिक्षण दिले जाते त्यांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले.
मेळाव्यास उपस्थित सर्व नागरिकांना पोलिस दलाकडून रेनकोट, फावडे , कुदळ,खुरपे, प्लास्टिक बकेट, घमेले, स्टील चे ताट आदी वस्तूंचे व १४२ पोते खते ज्यामधे युरिया, कृषिधन , डी ए पी, व पोटॅश या खताचे रास्त दरात वाटप करण्यात आले. व प्रधान मंत्री उज्वला गॅस अंतर्गत ८ लाभार्थींना गॅस शेगडी व सिलेंडर चे वाटप करण्यात आले. त्यामुळे उपस्थित लोकांनी पोलीस दलाचे आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक विश्वंभर कराळे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलिस हवालदार उसेंडी, नैताम, बनकर,भुरकुरे सह एसआरपीएफ गट क्र.१२ च्या अमलदारांनी परिश्रम घेतले.