The गडविश्व
ता.प्र / सावली, १३ जुलै : तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारिणी नुकतीच गठित करण्यात आली. यात अध्यक्ष म्हणून अनिल गुरुनुले, उपाध्यक्ष प्रफुल तुम्मे, सचिव आशिष दुधे तर प्रसिद्धीप्रमुख म्हणून देवाजी बावणे यांची एकमताने निवड करण्यात आली.
संघाचे पूर्वअध्यक्ष अनिल स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली तर उपाध्यक्ष सतीश बोम्मावार, सचिव लखन मेश्राम, प्रसिद्धीप्रमुख आशिष दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी गठित करण्यात आली.
सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यकारिणी गठित करण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे सदस्य दिलीप फुलबांधे, विजय कोरेवार, शितल पवार, खोजिंद्र येलमुले, आशिष पुण्यपवार, प्रविण गेडाम,राकेश गोलेपल्लीवार हजर होते.