– जिल्ह्यात मुसळधार पाऊस
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. असे असताना मुसळधार पावसाने नाल्यांना पूर आल्याने बांधकामावरील जेसीबीच्या बकेटधून गर्भवती महिलेला वाट काढावी लागल्याचे भयाण चित्र १८ जुलै रोजी सकाळच्या सुमारास आलापल्ली – भामरागड महामार्गावर पहावयास मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या नशिबी केवळ थट्टाच असल्याचे दिसून येत आहे.
भामरागड तालुक्यातील कुडकेली येथील जेवरी संदीप मडावी ही महिला गर्भवती आहे. २७ जुलै रोजी तिची प्रसूतीची तारीख होती मात्र १८ जुलैलाच सकाळी प्रसववेदना सुरु झाल्याने तिला आरोग्य अधिकारी व परिचारिका रुग्णवाहिकेतून भामरागड ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात होत्या. दरम्यान १८ जुलै रोजी मुसळधार पावसाने वाटेत असलेल्या मोठ्या नाल्यातून पाणी वाहत असल्याने रुग्वाहिका समोर नेता येत नव्हती. मात्र महिलेला रुग्णालयात पोहचविणे आवश्यक असल्याने शेवटी जेसीबीच्या बकेटमधे गर्भवती महिला व पतीला बसवून वाट काढावी लागली. नाल ओलांडून दुसऱ्या रुग्णवाहिकेतून तिला भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आलापल्ली- भामरागड राष्ट्रीय महामार्गाचे (क्र. १३० डी) सध्या बांधकाम सुरु आहे. मात्र सदर काम धीम्या गतीने सुरू आल्याने परिसरातील नागरीकांना याचा फटका बसत आहे. मूलाधार पावसाने परिसरातील नदी नाल्यांना पूर येत असतो त्यामुळे येथील नागरिकांचा तालुका, जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटत असतो. या मार्गावरील अनेक नाले असल्याने त्याठीकणी मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू आहे मात्र सदर काम मंदगतीने सुरू आहे. पर्यायी मार्ग काढण्यात आला आहे मात्र मुसळधार पावसाने नाले भरल्याने सदर मार्ग बंद झाले आहे त्यामुळे तिथून वाट काढणे अशक्य झाले आहे. असे असताना आज एका गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करत असताना नाल्यावर पाणी असल्याने दुसऱ्या बाजूला जाणे शक्य होत नव्हते मात्र ऐन वेळी तिथे जेसीबी असल्याने जेसीबीच्या बकेटमध्ये गर्भवती महिला व पतीला बसून त्यांना नाल्याच्या दुसऱ्या बाजूला सोडण्यात आले व दुसऱ्या रुग्णवाहिकेने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सदर परिसरात धीम्या गतीने होत असलेल्या कामाचा नागरिकांना फटका बसत आहे. याकडे मात्र येथील लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत असून धीम्या गतीने काम करणाऱ्या कंत्राटदारांना जाब विचारणार कोण हा सुधा प्रश्न उपस्थित होत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #bhamragd #alapalli #jcb #hospital #pregnantwomen )