– गावात रॅली काढून नवागतांचे पुष्प गुच्छ देत स्वागत
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, १ जुलै : विदर्भातील शाळा ३० जून पासून सुरू झाल्यात. त्यात शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळा नवागतांचे स्वागत गावात फेरी काढून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी दिव्यांग विद्यार्थीनी कल्याणी संजय गावळे वर्ग ७ वा हिला समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत लार्ज प्रिंट चे पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले.
या प्रसंगी श्रीमती रूबिना सय्यद अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, भोला पठाण सदस्य, धनंजय कुंभरे सदस्य, श्रीमती मोहनमाला रामटेक सदस्या,
श्रीमती कल्पना कांबळे सदस्या, अरूण डोंगरावर सदस्य, युनुस शेख केंद्र प्रमुख तथा मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद जिल्हा परिषद शाळा गेवर्धा, कैलाश जगने विशेष तज्ञ समावेशित शिक्षण गट साधन केंद्र पं. स. कुरखेडा उपस्थित होते तसेच या कार्यक्रमात समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत राबविण्यात येणार्या सोयी सुविधांची माहिती देण्यात आली. दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळाले.