इंग्रजी व सीबीएससी माध्यमातून चालणाऱ्या शाळांनी सुट्ट्या लागताच केली जाहिरात बाजीला सुरुवात

178

– पालकांनी विचार करून लुटीच्या साम्राज्याला घालावा आळा
The गडविश्व
प्रतिनिधी / ढानकी,३० एप्रिल : इंग्रजी शाळेच्या माध्यमातून आपले बाळ शिकले पाहिजे हा एक मधुर गोड गैरसमज पालकांच्या मनात रुजलेला असून सध्या इंग्रजी व सीबीएससी शाळेला सुगीचे दिवस आले आहेत. तसे बघता नुकत्याच परीक्षा संपल्यानंतर इंग्रजी व सीबीएससी शाळेला सुट्ट्या लागल्या त्या अनुषंगाने खाजगी इंग्रजी व सीबीएससी पॅटर्न असलेल्या शाळांनी जाहिरात बाजी करायला सुरुवात केली व लुटीच्या साम्राज्याला अधिक बळकटी येण्याची मोहीम हाती घेतली आहे. विविध जाहिरातीच्या माध्यमातून सुरुवात केली असून समाजात इंग्रजी शाळेची मक्तेदारी वाढत चाललेली आहे. येणाऱ्या काळात याची भीषणता अधिक प्रमाणात जाणवायला लागेल.
प्रत्येक पालकाला वाटत असते की माझ्या मुलाला इतर मुलापेक्षा अधिक गुण मिळावे म्हणून अधिकाधिक दर्जेदार शाळेत पालक मुलांना शाळेत टाकतात. मुलांना सुद्धा उत्कृष्ट गुण मिळतात पण पालकांनी सुद्धा आत्मचिंतन करायला पाहिजे की मुलाला गुण मिळाले पण त्या गुणात अवसान आणि कौशल्य आहे का, पालकांनी आपल्या मुलाचा दिलेला पेपर तपासून बघावा नक्की सत्यता बाहेर येईल. एका जागरूक पालकाला असाच अनुभव आला, आपला पाल्य गणित विषयात थोडा कच्चा आहे असे असताना सुद्धा एवढा गुणांचा आकडा कसा काय ? पालकांनी याबाबत शाळेत जाऊन चौकशी केली असता त्या पालकाला शाळेच्या प्रशासनाने उद्धटपणाची उत्तर दिले व तुम्हाला समजते की आम्हाला समजते, विद्यार्थ्यांचे भविष्य काय ते अशा प्रकारचे मार्मिक उत्तर मिळाले आणि पालकांना कळून चुकले की शाळा प्रशासन आपल्याजवळ काहीतरी लपवत आहे आणि लगेच पालकांनी योग्य निर्णय घेऊन मुलाची टीसी काढून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला. सांगायचं तात्पर्य हे की गुणांचा आकडा फुगवून आपले पटसंख्या कायम ठेवण्याची ही एक मायावी व खोटारडी कला आहे तेव्हा पालकांनी सुद्धा यापासून सावधान सजग राहिले पाहिजे.
शाळेच्या प्रांगणात सर्वात उंच पुतळा उभा करून आमच्या शाळेतील पुतळ्याला दोन हजार रुपयांचा हार लागते अशा फुशारक्या मारणाऱ्या मंडळींची समाजात वानवा उणीव याची कमी नाही पण महापुरुषांनी जीवनात कसे वागावे व विशेषता संस्थाचालकाने त्या महापुरुषाचे जीवनात स्वतः हा काही गुण आत्मसात केले का हे सुद्धा महत्त्वाचे. सर्वसामान्याच्या लुटीतूनच लुटीच्या स्वरूपातील साम्राज्य उभे करता येते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे इंग्रजी व सीबीएससी शाळेचा पॅटर्न होय. पालकाकडून भल्या मोठ्या स्वरूपात फी वसूल करून ज्ञानार्जन देत असलेल्या शिक्षकाला कमी पगार देऊन राबविणारी यंत्र यातून सक्रिय होऊन याद्वारे संस्थाचालक मलिदा लुटून गब्बर बनत आहे. सुशिक्षित बेरोजगारांची संख्या बघता काही हजारात शिकविण्यासाठी शिक्षक तरुण तयार होतात साहजिक सुद्धा आहे. सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण बघता ते सुद्धा संस्थाचालकाचा अन्याय अत्याचार गप्प राहून सगळे काही सहन करतात त्यांचा सुद्धा विलाज नसतो कारण आई-वडिलांनी काबाडकष्ट करून शिकविलेले असते. पालकांना जर इंग्लिश शाळेची भविष्यातील लूट व मक्तेदारी थांबवायचे असल्यास पालकच आळा घालू शकतात. शाळेची इमारत उभी राहिली तोपर्यंतच खर्च पुन्हा. इंग्रजी शाळा या सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडी ठरत आहे त्यामुळे अनेक डॉक्टर व कंत्राटदार यात सहभागी होऊन आपली कमाविलेली अर्थ माया पांढरी करण्याचा उपक्रम सुद्धा सुरू केला असून अशा संस्थाचालकांना शिक्षण महर्षी म्हणायचे का? हा प्रश्न येथे उपस्थित होतो. आपल्याला वरचढ मुख्याध्यापक न नेमता आपल्याला विरोध न करणाऱ्याची पदावर नियुक्ती करायची भले तो मुख्याध्यापक अनुभवहीन, अपरिपक्व, कर्तव्य शून्य, निष्क्रिय, उदासीन, का असेना पण स्वार्थापुढे काहीच हल्लीच्या संस्थाचालकांना दिसत नाही तसेच पुण्याईने व आशीर्वादाने मिळालेले कोणतेही पद जास्त दिवस टिकत नाही हे मुख्याध्यापकाने ध्यानात ठेवावे व तेवढेच सत्य.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here