– अक्षयकुमार, पारस, यशश्री करणार जिल्हाचे प्रतिनिधित्व
The गडविश्व
गडचिरोली, ८ जानेवारी : पुणे येथे ९ ते १२ जानेवारी २०२३ दरम्यान होणाऱ्या मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी गडचिरोली बॉक्सिंग केंद्राच्या तीन खेळाडूंची निवड झालेली आहे. त्यामध्ये अक्षयकुमार, पारस, यशश्री जिल्हाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्या वतीने अकोला येथे आयोजित ९१ व्या राज्य स्तरीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत गडचिरोली जिल्हातील दोन खेळाडूंनी उत्कृष्ठ प्रदर्शन केले असून कांस्य पदक पटकाविले. त्याची मिनी ऑलिम्पिक स्पर्धेकरिता निवड झालेली आहे त्यात ५१ किलो वजन गटात अक्षयकुमार कोवासे तर ९२ किलो वजन गटात पारस राऊत याची निवड झालेली आहे. तसेच नागपूर येथे झालेल्या २१ व्या वरीष्ठ महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत यशश्री साखरे हिने उत्कृष्ठ कामगिरी करत रौप्यपदक प्राप्त पटकाविले असून तिची सुद्धा मिनी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
सदर तिन्ही खेळाडू ९ ते १२ जानेवारी २०२३ रोजी छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणार असून बॉक्सिंग क्रीडा क्षेत्राला नवीन दिशा या खेळाडूंनी मिळवून दिली व गडचिरोली जिल्हाचे बॉक्सिंग क्षेत्रात एक नावलौकिक प्राप्त करून दिले आहे. सदर स्पर्धेसाठी संघ प्रशिक्षक म्हणून पंकज मडावी यांची निवड झालेली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष जगदीश म्हस्के, सचिन यशवंत कुरुडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल, कुस्ती प्रशिक्षक बडगेलवार, रोहित वैष्णोई आदिनी शुभेच्छा दिल्या. सदर खेळाडू गडचिरोली बॉक्सिंग संघटनेच्या मार्गदर्शनात यशस्वी सराव करीत असून सदर खेळाडू केंद्राचे नियमित खेळाडू असून त्यांना बॉक्सिंग प्रशिक्षक महेश निलेकार, पंकज मडावी, संतोष गैनवार, रजत देशमुख, निखिल इंगडे, प्रवीण मेश्राम, सुरज खोब्रागडे, संजय मानकर सर्वांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
(The Gadvishva) ( Gadchiroli News Updates) (Selection of three athletes from Gadchiroli district for Mini Olympic Games) (The Gadvishava) (Gadchiroli News) (Sports) (Liverpool vs Wolves) (Serie A) (Odisha FC) (Liverpool FC)