-धानोरा येथे इलाखा बैठक
The गडविश्व
गडचिरोली, १० जून : धानोरा येथे पेसा अंतर्गत ३३ गावातील ग्रामसभेचे अध्यक्ष, सचिव, पोलीस पाटील, गाव पाटिल यांची ईलाखा बैठक आयोजित केली होती. या बैठकीत जेष्ठ समाजसेवक देवाजी तोफा यांनी दारूमुळे आदिवासी संस्कृतीवर होणाऱ्या परिणामांवर मार्गदर्शन केले.
पुढे आदिवासी संस्कृतीचे नियम पटवून देतांना देवाजी तोफा म्हणाले की, आपली संस्कृती आता कुठं तरी विस्कळीत होत चालली आहे. या मागचे कारण एकच ते म्हणजे दारू. आपल्या समाजात दारू ही देवपूजासाठी लागते असे समजून मानवच दारू प्राशन करू लागले. कित्येक कार्यक्रमात ऐकायला मिळते की, दारू नसली तर कार्यक्रम चांगला होत नाही असे कुठे लिहले आहे का? असाही प्रश्न देवाजी तोफा यांनी उपस्थित केला.
आपल्या समाजातील तरुण मुल दारू सारख्या विषाच्या आहारी जाऊ लागले आहे. कित्येक तरुण मुलांमध्ये शारीरिक, मानसिक तसेच समाजात कौटुंबिक समस्या दिसून येत आहेत ,हे कुठं तरी थांबायला पाहिजे. अशाप्रकारे देवाजी तोफा यांनी दारूविषयी नुकसान पटवून दिले. दरम्यान, उपस्थित सर्व ईलाखा सहकाऱ्यांनी गावातील दारूचे प्रमाण कमी करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मुक्तीपथचे भास्कर कड्यामी व राहुल महाकुलकार यांनी व्यसन उपचार संदर्भात माहिती देऊन व्यसनाचे शारीरिक दुष्परिणाम समजावून सांगितले.