खळबळजनक : आठवडी बाजारात नक्षल्यांचा भ्याड हल्ला, दोन जवान गंभीर जखमी

3878

– आठवडी बाजारात कर्तव्य बजावातांना अचानक हल्ल्याने उडाली खळबळ
The गडविश्व
सुकमा (छ.ग) ०३ : आठवडी बाजारात कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा जवानांवर अचानक नक्षल्यांनी चाकूने भ्याड हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात दोन जवान गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना छत्तीसगडच्या सूकमा जिल्ह्यातील जगरगुंडा आठवडी बाजारात आज सकाळच्या सुमारास घडली. जखमी जवानांना तात्काळ उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले. करातम देवा आणि सोढी कन्ना अशी जखमी जवानांची नावे आहेत.
छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या सुकमा जिल्ह्यातील जगरगुंडा येथे आठवडी बाजार असल्याने सुरक्षा जवान तैनात होते. दरम्यान अचानक काही नागरिकांच्या विषेभूषेत आधीच घात लाऊन बसलेल्या नक्षल्यांनी जवानांवर चाकूने हल्ला चढवला. यात दोन जवान गंभीर जखमी झाल्याचे कळते. बाजार असल्याने खूप गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत नक्षल्यांनी अचानक जवानांवर हल्ला चढविला यावेळी बाजारात गोंधळ उडाला. पोलीस दलाने परिसरात शोध मोहीम तीव्र केली असून सध्या जखमी जवानांवर जगरगुंडा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता रायपूर येथे एरलिफ्ट करण्यात आले. जखमी मधील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत असून नक्षल्यांनी दोन्ही जवानांकडील शस्त्रे लुटल्याचे कळते. त्यात एके-47, एक एसएलआर आणि दारुगोळा यांचा समावेश आहे.

https://x.com/ANI/status/1852924989152108607?t=nprtVKCYMkp0r4VuJVOCpA&s=19

(#thegdv #thegadvishva #police #naxalattack #cgpolice #jagargunda #sukma #sukmapolice #gadchirolilocalnews #gadchirolipolice )

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here