– मृतक बालकांचा आकडा वाढण्याची शक्यता
The गडविश्व
झाशी, दि. १६ : उत्तर प्रदेशातील झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजला शुक्रवारी रात्री आग लगल्याने या भीषण आगीत
एनआयसीयू वॉर्डमध्ये दाखल असलेल्या १० नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून आग मोठी असल्याने आता मृतक बालकांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. दरम्यान शॉर्ट सर्किट आणि नंतर एसीचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
मेडिकल कॉलेजमधील निक्कू (न्यू बॉर्न इंटेन्सिव्ह केअर युनिट) वॉर्डमध्ये सुमारे १२ मुलांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. वॉर्डात रात्री ११.४० वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे कळते. आज लागल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत वॉर्डच्या खिडकीची काच फोडून आत पोहोचून गंभीररीत्या भाजलेल्या ८ मुलांना बाहेर काढले अशी माहिती आहे.
सदर घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
https://x.com/PTI_News/status/1857503396623954137?t=FkYwTu51vAb6HjEmjprixA&s=19
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #jhansi #uttarpradesh #icuward )