‘आपले सरकार’ पोर्टलवर १० ते १४ एप्रिल दरम्यान सेवा राहणार बंद

599

– नागरिकांनी वेळेत नियोजन करण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०९ : महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत ‘आपले सरकार’ सेवा पोर्टलवर तांत्रिक सुधारणा आणि हार्डवेअर अद्ययावतीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, त्यामुळे १० एप्रिल (गुरुवार) ते १४ एप्रिल (सोमवार) २०२५ या कालावधीत पोर्टलवरील सर्व सेवा तात्पुरत्या बंद राहणार आहेत.
या कालावधीत ‘आपले सरकार सेवा पोर्टल’, सेतू केंद्र, तसेच ग्रामपंचायत सेवा केंद्रांवरील प्रक्रिया व सेवा पूर्णपणे खंडित राहतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिली आहे.
या पाच दिवसांच्या कालावधीत बहुतांश दिवशी सार्वजनिक सुट्ट्या असल्याने, नागरिकांनी आणि संबंधित केंद्रे चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक त्या कामांचे पूर्वनियोजन करून सेवा प्रक्रियेत अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नागरिकांना कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये, यासाठी हे अद्ययावतीकरण काळजीपूर्वक आणि नियोजित पद्धतीने करण्यात येत आहे. ‘आपले सरकार’ पोर्टलच्या माध्यमातून हजारो नागरिक विविध योजनांचा लाभ घेत असतात, त्यामुळे हे अद्ययावतीकरण भविष्यातील सेवा कार्यक्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice
#आपलेसरकार #सेवाखंडित #GovTechMaharashtra #PublicNotice #DigitalIndia #GovernmentServices #गडचिरोली #तांत्रिकदेखभाल #आपलेसरकारपोर्टल #माहिती_तंत्रज्ञान

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here