The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, २८ जानेवारी : औरंगाबाद येथे आयोजित ५६ व्या निरंकारी संत समागमकरिता कुरखेडा तालुक्यातील संत निरंकारी मंडळाचे सेवादल व भाविकांचा जत्था गुरुवारी रवाना झाला.
रवाना होणाऱ्या भाविकांच्या वाहनाला माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे व पाणीपुरवठा सभापती ॲड.उमेश वालदे यांनी हिरवी झेंडी दाखविली. सद्गुरू माता सुदिक्षा महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत २७ ते ३० जानेवारी दरम्यान आयोजित ५६ व्या निरंकारी संत समागमात तालुक्यातील १०० सेवादल स्वयंसेवक व भाविकांचा जत्था रवाना झाला. तीन दिवसीय समागमात शोभायात्रा, सत्संग, सद्गुरू प्रवचन, सेवादल रॅली, सामूहिक विवाह सोहळा व गुरूवंदना आदी कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आलेली आहे.
याप्रसंगी संत निरंकारी मंडळाचे प्रमुख माधवदास निरंकारी, प्रा. किशोर खोपे, उल्हास महाजन, आबाजी आत्राम, अजय पुस्तोडे, कार्तिक धकाते, प्रदीप पुस्तोडें, जगदिश वरलानी, तानाजी ताराम आदी उपस्थित होते.