– पत्राद्वारे त्या वृत्ताचे केले खंडन
The गडविश्व
अहेरी, १ जानेवारी : स्थानिक नगरपंचायत क्षेत्रातील सार्वजनिक रस्त्यावरील बेकायदेशीर बांधकामास मदत व समर्थन केल्याचे नगरपंचायतच्या नगराध्यक्षा रोजा करपेत व आठ नगरपंचायत सदस्यांविरोधात भाजप गटनेत्या सौ. शालिनी संजय पोहणेकर यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे तक्रार केली व याबाबत काही वृत्तपत्रात वृत्त प्रकाशीत करण्यात आले असून सदर वृत्ताची दखल घेत नगराध्यक्षा रोजा करपेत यांनी शालिनी पोहणेकर यांच्या तक्रारीतील आरोप बिनबुडाचे असल्याचे पत्राद्वारे त्या वृत्ताचे खंडन केले आहे.
अहेरी नगर पंचायत च्या चालता क्रमांक ८७ मधील सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीर बांधकामास मदत व समर्थन केल्याचे नगराध्यक्षासह आठ सदस्यांविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे शालिनी पोहणेकर यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीची काही वृत्तपत्रात वृत्त प्रकाशीत करण्यात आले असता याबाबत माहिती मिळाली व जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी अधिनियम १९६५ नुसार कलम ४४ अन्वये नगराध्यक्षा रोजा करपेत व आठ सदस्यांना १० जानेवारी २०२३ ला जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्याचे नोटीस वृतपत्राच्या माध्यमाने जाहिर केले मात्र जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस किंवा नगराध्यक्षा अहेरी मुख्याधिकारी यांच्याकडून कसल्याही प्रकारचे संबंधित विषयाबद्दल नोटीस आम्हाला प्राप्त झाले नाही असे नगराध्यक्षा व आठ सदस्यांचे म्हणणे असून नगराध्यक्षा हद्दीतील प्रभाग क्रमांक १० मध्ये अजय रामाय्याजी कंकडालवार यांनी बांधण्यात येणारी इमारत व स्लॅप बांधकाम लोकांची कुठल्याही प्रकारचे हरकत नसल्याबाबत नगरसेविका सुरेखा गोडसेलवार यांचे अर्जनुसार मासिक मिटिंगमध्ये विषय ठेवण्यात आला. तसेच या अर्जावर चर्चा करत असतांना त्या बांधकामाचे कोणतेही त्रास होत नसल्याचे संमतीपत्र शेजारच्या मालमत्ता धारकांनी १०० रुपयाच्या स्टँप पेपरवर दिले. व या आधारावर चर्चा केल्यानंतर स्थानिक जनतेस कोणताही त्रास होत नाही असा ठरवा बहुमत्ताने घेण्यात आला. परंतु इमारत बांधकाम किंवा स्लॉप काँक्रीट बांधकामाची रितसर परवानगी देणे केवळ नगरपंचायत मुख्याधिकारी व बांधकाम संबंधित अधिकारीला असते. सदर ठरावामध्ये चालता क्रमांक ८७ यांच्या कुठल्याही प्रकारची नोंद नाही व या विषयाबद्दल अवैध बांधकामाला मी स्वतः व आमचे आठ नगरसेवक ठराव क्रमांक १९/५ मध्ये लेखी नोंद असल्याचे नमूद नाही म्हणून यात आमच्या कुठल्याही प्रकारचा ठरावाला समर्थन दिल्याचे स्पष्ट होत नाही. जेव्ह सदर बांधकामाबद्दल भाजपा गटनेत्या व इतर सदस्यांनी बांधकामा विरोधात आक्षेप घेतले असता. नगरपंचायत संबंधित अधिकारी यांना त्या बांधकामाच्या विरोधात कार्यवाही करण्याचा अधिकार असतो व लोकप्रतिनिधीचा नसतो.
या प्रकरणात जाणून बाजून हेतू परस्पर द्वेषभावनेने भाजपाचे गटनेत्या सौ. शालिनी संजय पोहणेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे खोटी तक्रार करून शासनाची व लोकांची दिशाभूल केली आहे. याप्रकरणा विरोधात तीव्र निषेध करून या तक्रारीची खंडन करत असून स्वतः व आठ नगरपंचायत सदस्य जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे १० जानेवारी २०२३ ला या प्रकरणाबाबत खुलासा करणार आहोत. सौ. शालिनी पोहणेकर यांनी कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता चुकीचे तक्रार केल्याने पुढे पत्रकार परिषदेतून आमची भूमिका मी स्वतः व संहयोगी गटनेता विलास गलबले ( आविसं ) आणि विलास सिडाम गटनेते ( शिवसेना ) ठाम पणे सत्यता मंडणार आहोत असे नगराध्यक्षा रोजा करपेत यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Al Nassr) (Real Madrid) (Real Madrid cf) (Rishabh Pant) (Happy New Year 2023) (Ajay kanakadalwar) (Roja korpet) (Aheri)