आरमोरी : कोजबी ग्रामपंचायतीवर शिवसेना समर्थित जनहित विकास परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय

518

– सरपंच पदी कविता ताडाम यांची थेट जनतेतून भरपूर मताधिक्याने विजय
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी (नरेश ढोरे), २० डिसेंबर : तालुक्यातील कोसंबी गट ग्रामपंचायत व सुकाळा ग्रामपंचायतचा सार्वत्रिक निवडणूक निकाल जाहीर झाला. त्यामध्ये कोसंबी ग्रामपंचायत मध्ये शिवसेना समर्थित जनहित विकास परिवर्तन पॅनल चा दणदणीत विजय झालेला असून सरपंच पदी सौ. कविता गुलाब ताडाम मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या. तर नऊपैकी सहा सदस्य निवडून आले आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक १ मधून पुरुष प्रवर्गातून प्रलय केशव चहांदे, अनुसूचित जमाती स्त्री राखीव प्रवर्गातून लोचना गुलाब जुमनाके, सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून पौर्णिमा विनोद मानकर, प्रभाग क्रमांक दोन मधून अनुसूचित जाती प्रवर्गातून अविनाश विलास गेडाम, अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून पुनम अमरदीप बोदेले. अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातून अश्विनी नागेशराव मसराम व प्रभाग क्रमांक तीन मधून विरोधी पॅनलचे कविता पाटील, मनोहर मोरांडे व शशिकला कुंभरे हे निवडून आलेले आहेत.
कोसंबी ग्रामपंचायत मध्ये माजी आमदार डॉ.रामकृष्ण मडावी यांच्या नेतृत्वाला भरभरून कौल दिल्याने जनतेचे आभार मानले.
कोसंबी ग्रामपंचायत चा निकाल जाहीर होतात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष निर्माण केला यामध्ये माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी व त्यांचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. ही विजयी रॅली तहसील कार्यालय आरमोरी ते माजी आमदार डॉ. रामकृष्ण जी मडावी यांच्या घरापर्यंत पोहोचली. रॅलीचे अभिनंदन करून माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी सर्व जनतेचे आभार मानले. यावेळी विनोद मानकर, विलास जुमनाके, भूतनाथ गेडाम, रामकृष्ण गेडाम, भास्कर मेश्राम, अनिल बर्डे, अमृत रणदिवे, भगवान मोहिते, देवानंद सोनटक्के, केशवजी चहांदे, भास्कर संयाम, जगदीश कुमरे, श्यामराव धाकडे, शेषराव सयाम, जयद्रथ बोदेले, विनोद शंभरकर, लोचन मडावी, जनार्दन शिडाम, शेषराव पिंपळे, सुरेश बर्डे, नरेश सोनटक्के, माणिक मानकर, भैय्याजी चहांदे, मदन चाहांदे, विनोद बर्डे, गौतम बर्डे, मोहनजी पिंपळे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी महेंद्रजी शेंडे, गोपालजी चौधरी, देविदास काळबांडे, अशोक चक्रवती, मिथुन मंडल, भूतोष राय, देवासी मंडल, डी.के. पिलांरे यांचे आभार मानून नवनियुक्त सर्व सदस्य व सरपंच यांचे माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी अभिनंदन केले.

(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (PSG) (Olivier Giroud) (Deepika Padukone FIFA) (Closing ceremony World Cup 2022) (Argentina vs France) (Shiv Sena-backed Public Interest Development Transformation Panel over the Kojbi Gram Panchayat)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here