– कारण अस्पष्ट, परिसरात खळबळ
The गडविश्व
कोल्हापूर, २० जानेवारी : भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेल्या तरून जवानाने टोकाचे पाऊल उचलत आपल्या राहत्या घरात दोरीने दोरीने गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याच्या काखे येथे १९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. सत्यजित महादेव खुडे (२८) असे गळफास घेतलेल्या मृतक व्यक्तीचे नाव आहे. सदर घटनेने मात्र परिसरात एकच खळबळ उडाली असून गळफास का घेतला याचे कारण अद्याप कळू शकले नाही अशी माहिती आहे. सत्यजीतने असे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. घटनेची नोंद पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
(Shocking: A young soldier working in the army hanged himself) (The Gadvishava) (Gadchiroli News) (Muktipath) (Usain Bolt) (Trossard) (That ’90s Show) (Hockey World Cup 2023) (Man City vs Tottenham) (Kolahpur)