धक्कादायक : मध्यरात्री मोठा भूकंप, मृतकांचा आकडा पन्नास च्या वर, दिल्लीला हादरा

942

– मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता
The गडविश्व
नवी दिल्ली, दि.०४ : मध्यरात्रीच्या भूकंपामुळे नेपाळसह उत्तर भारत हादरला आहे. या दुर्घनेत आत्तापर्यंत नेपाळमधील ६९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
नेपाळमधील भूकंपाची तीव्रता ६.४ रिश्टर स्केल एवढी नोंद झाली असून या भूंकपाच्या धक्क्याने राजधानी दिल्लीतील एनसीआरला हादरा दिला आहे. तर उत्तर भारताच्या काही भागांतही या भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती आहे.

नेपाळच्या उत्तरी-पश्चिम जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मध्यरात्री हे भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळच्या पीएमओ कार्यालयानेही ट्विट करुन नेपाळमधील भूकंपाची माहिती दिली. तसेच, घडलेल्या घटनेबाबत शोक व्यक्त करत संबंधित बचाव पथकांना घटनास्थळी पाठवल्यात आल्याचे सांगितले. नेपाळच्या जजरकोट येथील पश्चिम भागात हा शक्तीशाली भूकंप झाल्याचे पीएमओने सांगितले.
दरम्यान, रुकुम जिल्ह्यातच ३६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, मृतांची संख्या ६९ वर पोहोचली असून हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
दिल्ली-एनसीआर, यूपी, बिहार, उत्तराखंड आणि हरियाणासह देशातील अनेक भागांत भूकंपाचे जोरदार धक्के बसल्यानं पृथ्वी हादरली. भूकंपाचे धक्के इतके जबरदस्त होते की, लोकांमध्ये भीती पसरली होती. अचानक आलेल्या या भूकंपामुळे लोक घराबाहेर पडले.

(the gdv, the gadvishva, gadchiroli news updates, delhi, earth attack, nepaal,Shocking: Big earthquake in the middle of the night, the number of dead is above fifty, tremor in Delhi)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here