– पोलीसांकडून कसुन तपास
The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : शहरातील गोकुळनगर येथील एका महिलेच्या घरात मृत अर्भक आढळल्याची घटना दोन दिवसांपुर्वी उघडकीस आली होती. सदर घटनेने एकच खळबळ उडाली असुन प्रकरणाचे गांर्भीय लक्षात घेत गडचिरोली पोलीसांव्दारे कसुन तपास केल्या जात असल्याचे कळते.
एका जोडप्याचा विवाह सुनिश्चित झाला होता. विवाह २१ जानेवारी रोजी होणार होता असे कळते. मात्र त्यापूर्वीच होणाऱ्या उपवधूने एका बाळास जन्म दिला व आपली बदनामी होईल या भितीने युवतीने नवजात बाळाची हत्या करून मृतदेह गोकुळनगर येथील आपल्या नातेवाईकाच्या घरात लपवून ठेवले व गुरूवारी सदर घरात मृतावस्थेत अर्भक आढळून आल्याचे समजते. सदर घटनेने गोकुळनगरसह शहरात खळबळ उडाली. पोलीसांनी घटनास्थळ गाठून नवजात बाळाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्या रूग्णालयात रवाना केला असुन प्रकरणाचे गांर्भीर्य लक्षात घेवून गडचिरोली पोलीसांनी गुप्तपणे चौकशी सुरू केल्याचेही कळते. तर सदर प्रकरणातील काही संशयीतांना पोलीसांनी ताब्यात घेवून चौकशी सुरू असल्याचे समजते. संपुर्ण तपासाअंती हत्येचे गुढ उकलण्यात येणार असुन तो नवजात अर्भक नेमका कुणाचा याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलीसांपुढे आहे.
(the gadvishva, the gdv, gadvishva, gadchiroli news)