धक्कादायक : डास मारण्याचे औषध तोंडात गेल्यामुळे दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

637

The गडविश्व
नागपूर, १४ फेब्रुवारी : दिड वर्षांच्या चिमुकलीकडे दुर्लक्ष केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवार १३ फेब्रुवारी रोजी नागपुरात नागपुरात समोर आली. रिद्धी दिनेश चौधरी असे मृतक चिमुकलीचे नाव आहे.
सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या चौधरी कुटुंबातील रिद्धी नावाच्या दीड वर्षीय चिमुकलीने घरात लावलेली डास पळविणारी मशीन खेळता खेळता हाती घेतली व कुणाचे लक्ष नसल्याने तिने ती बॉटल तोंडात टाकली व चाटायला लागली. काही वेळातच तिची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
एखादी विषारी वस्तू लहान मुलांपासून दूर ठेवा असे या उत्पादनांवर लिहलेले असते. अशी माहिती दिलेली असताना देखील पालकांचे याकडे कधीकधी होणारे दुर्लक्ष किती महागात पडू शकते. सदर घटनेने मात्र हालहाल व्यक्त करण्यात येत आहे.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Valentine’s Day gifts) (Valentine’s Day) (PSG vs Bayern) (Liverpool vs Everton) (Super Bowl) (Chelsea) (PSG) vs Toulouse) (Man United vs Leeds United)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here