– दोघांवर गुन्हा दाखल
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : जिल्हयात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतांना दिसत असुन आरमोरी तालुका मुख्यालयात रेस्टारंट मध्ये चार्जर न दिल्याने युवतीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना १५ ऑगस्ट रोजी घडली. सदर संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असुन याबाबतचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे. या प्रकरणातील आरोपी सोहेल मेहमूद शेख, अब्दुल अयुब नासिर शेख हे फरार झाले होते. गडचिरोली पोलिस दलाने सदर दोन्ही फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना आज १९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी अटक केली. अटकेनंतर दोन्ही आरोपितांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
सदर घटनेची दखल घेत शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय पदाधीकारी, विविध संघटनेच्या वतीने उद्या २० ऑगस्ट रोजी घटनेतील आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी व घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी आरमोरी शहर कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आरमोरी शहरातील वडसा टी पाईंट चौकात असलेल्या शिवम कॅफे रेस्टॉरंट मध्ये काम करीत असलेल्या सेल्सपर्सन युवतीला रेस्टारंट मध्ये आलेल्या दोघांनी चार्जर मागिलते असता तिने चार्जर देण्यास नकार दिल्याने दोघांनी तिला बेदम मारहाण केली. मारहाण करतांनाची संपुर्ण घटना रेस्टारंटमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असुन याबाबचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या माध्यमातून घटना उजेडात आल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटतांना दिसत आहे. सदर घटनेने आरमोरी शहरासह गडचिरोली जिल्हयात खळबळ उडाली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास गडचिरोली पोलीस करत आहेत.
आमदार गजबेंनी घेतली दखल
आरमोरी शहरातील शिवम कॅफे मध्ये युवतीला मारहाण केल्याचे प्रकरण आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार गजबे कानी पडताच त्यांनी तालुका मुख्यालयी धाव घेत प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर घटना अतिशय निंदनीय आहे, आरोपींवर कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली असून शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय पदाधीकारी, विविध संघटनेच्या वतीने उद्या २० ऑगस्ट रोजी घटनेतील आरोपीला शिक्षा व्हावी व निषेध नोंदविण्यासाठीआरमोरी शहर कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(#thegdv #gadchirolinews #armori #crimenews #gadchirolilocalnews #thegadvishva )