धक्कादायक : बोरमाळात आईच्या डोळ्यादेखत चिमुकल्यास वाघाने नेले उचलून

3050

– परिसरात एकचं खळबळ
The गडविश्व
ता.प्र / सावली , ३० मार्च : .

आईच्या डोळ्यासमोर चार वर्षीय चिमुकल्यास वाघाने उचलून नेल्याची घटना सावली तालुक्यातील वैनगंगा नदी काठावर असलेल्या बोरमाळा येथे २९ मार्च रोजी रात्रोच्या सुमारास घडल्याची माहिती पुढे येत आहे. सदर घटनेने परिसरात एकचं खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. हर्षल संजय कारमेंगे (४) असे चिमुकल्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, रात्रोच्या सुमारास हर्षल ला आईने घरासमोर शौचास बसविले यावेळी अचानक वाघाने हर्षल वर हल्ला केला दरम्यान आईने क्षणाचाही विलंब न करता आरडाओरड केली मात्र वाघाने हर्षल ला उचलून नेले. सदर घटनेने मात्र परिसरात एकचं खळबळ उडाली असून घटनेची माहिती वनविभाग, पोलिसांना देण्यात आल्याचे कळते. तर घटनेची माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. या घटनेने मात्र परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हर्षल चा शोध घेणे सुरू असल्याचे सुत्रांनुसार कळते. तर सदर घटनेनंतर हर्षल च्या आईने हंबरडा फोडला. घटनेची माहिती गावात पसरताच गावकरी सतर्क होत चर्चेला उधाण देत असुन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तालुक्यातील दुसरी घटना

हर्षल चे वडील मिरची तोडणीसाठी आंध्रप्रदेशात गेले असून त्यांना हा एकच मुलगा होता. तालुक्यातील ही दूसरी घटना असून पाच वर्षाअगोदर सिर्सी येथील तीन वर्षाच्या मुलीला बिबट्याने उचलून नेले होते. सलग तीन दिवसांच्या शोध मोहीम झाल्यानंतर त्या मुलीचे केस व कपडे सापडून आले होते.

(The gdv) (The gadvishva) (saoli chndrpur bormaala) (tiger attack children)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here