धक्कादायक : रोवणी करतांना विजांचा कडकडाट, वीज कोसळून महिलेचा मृत्यू

1637

एक महिला गंभीर जखमी
The गडविश्व
सावली, दि. १४ : पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी सावली तालुक्यात आज बुधवार १४ ऑगस्ट रोजी अचानक विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान रोवणीला गेलेल्या महिलेवर वीज कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला तर सोबतची दुसरी महिला गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
चित्रकला सुधाकर भुरसे ( वय ४०) रा. केरोडा असे मृतक महिलेचे नाव आहे तर शालू भास्कर भुरसे असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे.
सावली तालुक्यात आज बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास आचानक पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील केरोडा येथील शेतशिवारात रोवणी रोवत असतांना प्रचंड विजांचा कडकडाट सुरू झाला. दरम्यान अचानक वीज रोवणी रोवत असलेल्या चित्रकला भुरसे यांच्या अंगावर कोसळली यात त्या जागीच गतप्राण झाल्या तर सोबत असलेल्या शालू भुरसे हे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी सावली पोलिस दाखल होत पंचनामा करून जखमी महिलेस लागलीच गडचिरोली येथे उपचारासाठी हलविण्यात आले.
सदर घटनेने केरोडा येथे शोककळा पसरली असून मृतक चित्रकला भुरसे यांच्या पश्चात पती, दोन मुले आहेत. त्यांच्या अशा मृत्युने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here