– मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहत आरोपींना इशारा
The गडविश्व
बिजापूर, दि. ०४ : छत्तीसगडमधील बिजापूर येथील युवा पत्रकार मुकेश चंद्राकर यांची हत्या करून मृतदेह सेप्टिक टँकमध्ये टाकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी घटनेतील आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही असे असे मत व्यक्त करीत श्रद्धांजली वाहिली आहे. पत्रकार मुकेश चंद्राकर हे अनेक वर्षापासून छत्तीसगडच्या बिजापूर मध्ये पत्रकारिता करीत आहे. त्यांचे बस्तर जंक्शन या नावाचे युट्यूब चॅनल असून लाखोंच्या संख्येत त्यांचे सबस्क्राईबर आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्रकार मुकेश हे १ जानेवारीला संध्याकाळी फक्त टी-शर्ट आणि लोवर घालून घराबाहेर गेले होते व काही वेळाने त्यांचा फोन बंद झाला. रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने त्याचा भाऊ व पत्रकार युकेश चंद्राकर यांनी जवळच्यांच्या घरांची व शहरातील विविध ठिकाणी शोधाशोध केली. मात्र त्यांचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर भाऊ युकेश चंद्राकर यांनी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी शोधमोही हाती घेतली असता शुक्रवार ३ जानेवारी रोजी मुकेशच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन एका कंत्राटदाराच्या अंगणात दिसल्याने तेथे शोध घेतला असता सेप्टिक टँक खाली मुकेशचा मृतदेह आढळून आला. मृतदेह फुगलेला असल्याने त्याच्या कपड्यांवरून त्याची ओळख पटली. तर रस्ता बांधकामातील भ्रष्टाचाराच्या बातम्यांवरून त्यांचा कंत्राटदाराशी वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. सदर घटनेने खळबळ उडाली असून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकाराची अशी हत्या करण्यात आल्याने पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून पत्रकारांना त्यांच्या निष्पक्ष पत्रकारितेची किंमत जीव देऊन चुकवावी लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेले नसल्याची माहिती आहे. सदर घटनेबाबत छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी एक्स वर श्रद्धांजली वाहत आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही असे मत व्यक केले आहे. https://x.com/vishnudsai/status/1875190248252248457?t=GLSi_kq8tW97VTUwp8ZDhA&s=19
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #crimenews #cgnews #mukeshchandrakar #reportarmukeshxhandrakar #bastrjankshan)