भामरागड ग्रामीण रुग्णालयात भरती रुग्णांसाठी बेडची कमतरता

231

– उपचारासाठी दाखल रुग्णांसाठी जादा बेड उपलब्ध करून देण्याची कंकडालवार यांची मागणी
The गडविश्व
भामरागड, दि. २३ : येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था ऑक्सिजनवर असून रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांना बेडच्या अभावी आल्यापावली घरी परत परतावे लागत असल्याची रुग्णांच्या नातेवाइकांकडून माहिती प्राप्त झाल्याने सदर बाब अतीशय गंभीर स्वरूपाची असून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांना तात्काळ जादा बेड उपलब्ध करून देण्याची मागणी काँग्रेस नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी केली आहे.
भामरागड तालुका हा यापूर्वी आरोग्याच्या दृष्टीकोनातून अनेकदा चर्चेत आलेला आहे. पावसाळा असल्याने सगळीकडे रोगराई पसरत आहे. रोगराईमुळे दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच भामरागड ग्रामीण रुग्णालयात केवळ तीस बेड उपलब्ध असून दररोज उपचारासाठी शंभर ते दीडशे मलेरिया व डेंगू रुग्ण रुग्णालयात भरती होण्यासाठी येत असतात. मात्र रुग्णालयात भरती रुग्णासाठी केवळ तीस बेडची व्यवस्था असल्यामुळे या अपुरे व्यवस्थेमुळे रुग्णांना तात्पुरते उपचार करून घेऊन घरी परतावे लागत असल्याची माहिती मिळाल्याने या गंभीर बाबीची दखल घेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसाठी जादा बेडची तात्काळ व्यवस्था करून देण्याची मागणी केली आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #bhamragad )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here