गडचिरोली जिल्हा रक्तपेढीत रक्तसाठ्याचा तुटवडा : रक्तदानासाठी पुढाकार घ्या

112

– जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन, २१ व २१ मे ला रक्तदान शिबीर
The गडविश्व
गडचिरोली, दि.१७ : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्तसाठ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा रक्तसाठयाचा भरून काढण्याकरिता जास्तीत जास्त रक्तदात्यानी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते यांनी केले आहे.
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात (District General Hospital) असलेल्या रक्तपेढीत रक्तसाठा तुटवडा जाणवत आहे. अशातच जिल्हा सामान्य रुग्णालयात गरीब, गरजू व अपघातग्रस्त तसेच सिकलसेल ग्रस्त रुग्ण व प्रसव मातांना वेळेवर रक्तपुरवठा करताना अडचण येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा व जिल्ह्याबाहेरील तसेच कधी शेजारील राज्यातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णांना वेळेवर कधी रक्ताची गरज पडत असते तेव्हा त्यांना रक्त पुरवठा करण्यात येत असतो. मात्र सध्याच्या स्थितीत रक्तपेढीमध्ये रक्तसाठ्याचा तुटवडा जाणवत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे २० व २१ मे २०२४ रोजी आयोजित रक्तदान शिबीरात जास्तीत-जास्त संख्येने जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच इच्छूक रक्तदात्यांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी केले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #blooddonetcamp #gadchiroliDistrictGeneralHospital)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here