The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १५ फेब्रुवारी : येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचलित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा सत्र २०२२ -२०२३ चे विशेष राष्ट्रीय सेवा योजनाच्या माध्यमातून ग्रामसशक्तिकरण तथा जनजागृती करिता युवाशक्ती या विषयावर विशेष शिबिर ८ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. १४ फेब्रुवारी २०२३ रोजी या शिबिराचा समारोप करण्यात आला.
यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .पंकज चव्हाण तर विशेष अतिथी म्हणून विनोद लेनगुरे माजी जि. प. सदस्य, श्रीमती. नंदाताई दुगा सरपंच लेखा, महेंद्र उईके उपसरपंच ग्रामपंचायत लेखा, बाबुराव पाटील उईके पोलीस पाटील कन्हारटोला, विनोदजी करंगामी, उइके मुख्याध्यापक जि.प. शाळा कन्हारटोला, रंजन उइके इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच विषेश उपस्थिति म्हणून डॉ.राजु किरमिरे, डॉ. वाघ, डॉ लांजेवार, डॉ.झाडे, डॉ.चुधरी व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.पंकज चव्हाण यांनी राष्ट्रीय सेवायोजना व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यावर विस्तृत मार्गदर्शन केले तर डॉ.राजु किरमिरे यांनी विद्यार्थी जीवन जगत असताना सामाजिक कार्यासोबतच आपला सर्वांगीण विकास कसा करावा यावर मार्गदर्शन केले. डॉ वाघ यांनी महात्मा गांधीजी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण समाजाचा उद्धार व्हावा मग राष्ट्राचा उद्धार होईल अशा पद्धतीचे अंतरंग बाळगणारी युवा पिढी निर्माण व्हावी यावर प्रकाश टाकला. राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरा दरम्यान बंधारा बांधण्यात आला. नाली स्वच्छता, ग्राम स्वच्छता, शोषखड्डे तयार करण्यात आले, जि. प.शाळेचा सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला, टाकाऊ वस्तुचे व कचरा जाळून स्वच्छता करण्यात आली. या राष्ट्रीय शिबिरामध्ये बौद्धिक सत्र अंतर्गत पर्यावरण संवर्धन बँकांच्या विविध शासकीय योजना आर्थिक साक्षरता अभियान तंबाखूमुक्त ग्राम सत्र घेण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक ज्ञानेश बनसोड राष्ट्रीय कार्यक्रम अधिकारी यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन डॉ .प्रियंका पठाडे यांनी केले तर आभार प्राध्यापक प्रशांत वाळके यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक नितेश पुण्यपरेड्डीवार, प्राध्यापक तोंडरे, डॉ. गोहने प्रा. गोरडवार, प्रा. रणदिवे, प्रा.आवारी, प्रा. करमणकर, प्रा. भैसारे, डॉ. मुरकुटे, डॉ. धवनकर, प्रा. खोब्रागडे व सर्व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. व रा से यो योजनेचे सर्व स्वयंसेवक यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.