The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : धानोरा तालुक्यातील चातगाव स्थित ‘सर्च’ रुग्णालयात आय.सी.एम.आर सिकलसेल टीम चंद्रपुर व सर्च यांच्या सहकार्याने सिकलसेल ओपीडीचे नियोजन करण्यात आले आहे. १७ एप्रिल २०२४ या दिवशी सर्च रुग्णालयात सिकलसेल ओपीडी घेण्यात येणार असून, आय.सी.एम.आर सिकलसेल चंद्रपुर टिमचे डॉक्टर या ओपीडीसाठी उपस्थित राहतील.
सिकलसेल आजार हा अंनुवांशिक आजार आहे. यात आई व वडील दोघेही सिकलसेल रुग्ण किवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्याना हा आजार होऊ शकतो. आजाराची माहिती, लक्षणे व रुग्णांनी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन तसेच मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार या ओपिडी मध्ये दिल्या जाईल. तरी बुधवार १७ एप्रिल २०२४ रोजी सिकलसेल ओपीडीमध्ये तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व उपचार सुविधेचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ करून घ्यावा, असे आवाहन सर्च रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews)