उद्या चातगाव येथील ‘सर्च’ रुग्णालयात ‘सिकल सेल ओपीडी’

264

The गडविश्व
गडचिरोली, १४ फेब्रुवारी : सिकल सेल आजार हा अंनुवांशिक आजार आहे. यात आई व वडील दोघे ही सिकलसेल रुग्ण किवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्याना हा आजार होऊ शकतो. सिकलसेल आजारचे दोन प्रकार असतात रुग्ण व वाहक. रुग्ण व्यक्तिला नेहमी जंतुसंसर्ग व त्रास होतो. वाहक व्यक्तिला सिकलसेल आजारचा त्रास कमी होतो. पण तो पुढील पिढीस सिकलसेल आजार देऊ शकतो. आजाराची माहिती, लक्षणे व रुग्णांनी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन तसेच तपासणी व उपचार या ओपिडी मध्ये केल्या जाईल. काळाची गरज समजून आणि रुग्णांमधील गुंतागुंतीच्या वाढत्या प्रवृत्तीचा विचार करून चातगाव येथील ‘सर्च’ हॉस्पिटलमध्ये ‘सिकल सेल ओपीडी’ ला सुरुवात करण्यात आली आहे.
आयसीएमआर सिकलसेल टिम चंद्रपुर व सर्च यांच्या सहकार्याने ‘सर्च’ हॉस्पिटल मध्ये नियमित ‘सिकल सेल ओपीडी’ सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक महिन्याच्या तिसर्‍या बुधवारी ही ओपीडी असेल. १५ फेब्रुवारी २०२३ या दिवशी ‘सर्च’ मध्ये ‘सिकल सेल ओपीडी’ घेण्यात येणार असून डॉ. कल्पिता गावीत व त्यांची टिम या ओपीडीसाठी उपस्थित राहणार आहेत. सिकल सेल रोगाचे निदान करण्यासाठी तपासणी केल्या जाईल ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता याची माहिती तज्ञांना मिळेल.
तरी सिकल सेल विकाराने त्रस्त असलेल्या जास्तीत जास्त रुग्णांनी या ओपीडीचा लाभ घ्यावा तसेच गैरसोय होऊ नये म्हणून हॉस्पिटल मध्ये पूर्व नोंदणी करावी. असे आवाहन ‘सर्च ‘कडून करण्यात येत आहे.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Valentine’s Day gifts) (Valentine’s Day) (PSG vs Bayern) (Liverpool vs Everton) (Super Bowl) (Chelsea) (PSG) vs Toulouse) (Man United vs Leeds United)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here