– श्रमदानातून उभारला विजयस्तंभ
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : अहेरी तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या मेडपल्ली गावात मागील २००९ पासून अवैध दारूविक्री बंद आहे. गावात दारूबंदी असल्याने कोणते फायदे होतात, ही बाब इतरही गावांच्या लक्षात यावी या हेतून ग्रामस्थांनी श्रमदानातून दारूबंदीचा विजयस्तंभ उभारून विजयोस्तव साजरा केला.
मेडपल्ली येथे ग्रामस्थांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन दारूबंदी कायमस्वरूपी करण्यात आली. २००९ पासून या गावात दारूबंदी असल्याने गावात विविध उपक्रम अतिशय शांतरीतीने पार पाडले जातात. दारूबंदीमुळे गावातली तंटे कमी झाले. मुलं चांगले शिक्षण घेत आहेत. आमच्या गावाची प्रेरणा इतर गावांनी घ्यावी, या हेतुने गावातील लोकांनी श्रमदाच्या माध्यमातून गावाच्या मुख्य ठिकाणी विजयस्तंभ बोर्ड उभारले. ही दारूबंदी कायम ठेवण्यासाठी गाव संघटनेच्या सदस्यांसह ग्रामस्थ सक्रिय आहेत. यावेळी सरपंच निलेश वेलादी, भगवान मडावी, मारोती पेंदाम, इंदरशहा वेलादी, जोगा तलांडी, प्रेमीला कोडापे, कमला तलांडी, शंकर पेंदाम व मार्गदर्शक म्हणून मुक्तीपथ तालूका संघटक राहुल महाकुलकर, तालुका प्रेरक नंदिनी आशा, मुक्तीपथ कार्यकर्ता भूषण गौरी उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath #loksabhaelecation2024)