The गडविश्व
सिरोंचा, २५ नोव्हेंबर : गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेस असलेल्या सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम भागात जिल्हा काँग्रेस व तालुका काँग्रेस कमिटी तर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
सिरोंचा तालुक्यातील आदिवासी बहुल कुटुंब असणाऱ्या बेज्जूरपल्ली, वेण्यलाया गावातील १५० कुटुंबाना जिल्हा काँग्रेस व तालुका काँग्रेस कमिटी तर्फे राशन किट, तांदूळ, ब्लॅंकेटचे वितरण माजी आमदार पि. आर.तलांडी, काँग्रेस जेष्ठ नेते शंकर पुप्पालवार, अहेमद आली यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी नव निर्वाचित तालुका अध्यक्ष सतीश जवाजी, माजीद अली, शेख जलील, शेखर सल्ला, साई कुमार बिलकी आदी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.