बाल लैंगिक अत्याचारातील फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या

158

The गडविश्व
गडचिरोली, १९ ऑक्टोबर : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून फरार असलेल्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. संजु बबलु रॉय व प्रदिप दिपक रॉय असे आरोपींची नावे आहेत.
जिल्ह्यातील चामोर्शी पोलीस ठाण्यात पीडितेने ५ सप्टेंबर २०२३ ला तक्रार दिली. त्यात तिने सांगितले की आरोपी संजू बबलु रॉय याने त्याचा नातेवाईक प्रदीप दिपक रॉय याच्या मदतीने लैंगिक अत्याचार केला. या तक्रारीवरून पोलीस ठाणे चामोर्शी येथे गुन्हा नोंद करून तपास सुरु करण्यात असता त्या दरम्यान आरोपी प्रदिप दिपक रॉय यास अटक करण्यात आली होती. परंतु, गुन्ह्याची चाहुल लागताच मुख्य आरोपी संजु बबलु रॉय हा त्याचे राहते घरातून तसेच परिसरातून फरार झाला. सदर गुन्ह्राचे गांभीर्य बघून पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व कर्मचारी यांना फरार आरोपीचा शोध घेण्याबाबत निर्देशित केले. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक आरोपीचा ठावठिकाणा मिळवित असतांना आरोपी वारंवार परराज्यात व परजिल्ह्रात राहुन त्याचा ठावठिकाणा बदलवित असल्याचे कळले. तरीदेखिल तपास पथकांनी त्यांचे शोध घेण्याचे कार्य सुरु ठेवले असतांना गोपनिय सुत्रांकडून खात्रीशीर माहितीच्या आधारे १८ ऑक्टोबर २०२३ ला फरार आरोपी संजु बबलु रॉय हा आष्टी-गोंडपिपरी मार्गावर त्याचे नातेवाईकास भेटण्याकरीता येणार असल्याच्या माहीतीवरून स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचून ताब्यात घेत पुढील कारवाईस्तव पोलीस स्टेशन चामोर्शी यांचे ताब्यात दिले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांचे आदेशाने व पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. राहुल आव्हाड, पोशि/3951 प्रशांत गरफडे व चापोहवा/1681 मनोहर तोगरवार यांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here