कॉन्व्हेन्टपेक्षा भारी समाज कल्याण विभागाच्या सरकारी शाळेची गुणवत्ता : निकाल १०० टक्के

382

The गडविश्व
गडचिरोली, ९ जून : गडचिरोली या दुर्गम जिल्ह्यात समाज कल्याण विभागाच्या सरकारी शाळेची गुणवत्ता जास्त रुपये फी असणाऱ्या कॉन्व्हेन्टपेक्षा भारी ठरली आहे. समाज कल्याण विभागाच्या या जिल्ह्यात २ निवासी शाळा आहे. या दोन्ही शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. तसेच जिल्ह्यात 7 मुला मुलींचे शासकीय वसतिगृह आहे येथील १० वी चा १०० टक्के निकाल लागला आहे.
शासकीय अनु.जातीच्या मुलांची निवासी शाळा , वांगेपल्ली ता. अहेरी निकाल १०० टक्के प्रथम क्रमांक राम जिमडे ८७%, द्वितीय क्रमांक प्रफुल चापले ८५.६%, तृतीय क्रमांक प्रथम गलबले ८५%. अनु.जातीच्या मुलींची शासकीय निवासी शाळा , सिरोंचा प्रथम क्रमांक कु. वसंता बुच्चम गोमासी ८९.२०%, द्वितीय क्रमांक कु. राधिका महेश दुर्गम ८८%, तृतीय क्रमांक कु. मोनिका बानय्या कोंडागोर्ला ८७.४०%.
आज खासगी शाळेंची लाखो रुपये फी असताना अशा वेळी गरीब मागासवर्गीयांच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे काम समाज कल्याण विभाग करते. सुसज्ज देखणी इमारत, सर्व सोयीसुविधा उपलब्ध. या शाळेत ६ वी ते १० वी पर्यंत निवासी शिक्षण असते. येथे विद्यार्थ्यांची राहणे,भोजन, पुस्तके,सर्व मोफत मिळते. दररोज सकाळी दूध, फळ,नाश्ता, उकळलेले अंडी, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण, प्रत्येक रविवारी (नॉन व्हेज जेवण, स्वीट) शाळेत सर्व पुस्तके,वह्या पेन आंघोळीचे साबण, तेल पावडर या सर्व सुविधा मोफत मिळते.
तरी सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी येथे प्रवेश घ्यावा असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here