The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १९ : तालुक्यातील मुरूमगाव येथील सोहेल मुनीर शेख यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे मार्फत ७ जुलै २०२४ ला घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य योग्यता (M- S E T) परीक्षेत त्याला अर्थशास्त्र या विषयासाठी यश मिळाले.
सहाय्यक प्राध्यापक योग्यता परीक्षे साठी त्याने पुणे येथून एम.ए. अर्थशास्त्र विषयाला प्रविष्ट असताना पहिल्याच प्रयत्नात सेट परीक्षा उत्तीर्ण केली हे विशेष.
त्यांचे प्राथमिक शिक्षण जि.प. उच्च .प्रा . केंद्र शाळा मुरुमगाव येथे झाले, तिथूनच नवोदय विद्यालय घोट येथे निवड झाली, पदवीतर शिक्षण पुणे येथे पूर्ण करताना सेट परीक्षा उत्तीर्ण केली.
त्यांनी आपले यशाचे श्रेय आई शाकरीन मुनीर शेख, वडील माजी ग्रा. प. सदस्य मुनिरभार्ई इस्माईल शेख, ए. पि. आय मिथुन शिरसाट, सरपंच शिवप्रसाद गवर्णा आदींना दिले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #dhanora)