गडचिरोलीत जात वैधता प्रमाणपत्रांसाठी विशेष कृती कार्यक्रम

26

The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “१०० दिवसांचे लक्ष” उपक्रमांतर्गत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन विविध सेवा सुलभ करण्यावर भर देत आहे. या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यात जात वैधता प्रमाणपत्र न मिळालेल्या अर्जदारांसाठी विशेष कृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सन २०२४-२५ मध्ये अर्ज दाखल केलेल्या, पण अद्याप प्रमाणपत्र न मिळालेल्या अर्जदारांनी, पूर्वी कळविण्यात आलेल्या त्रुटी दूर करून आवश्यक कागदपत्रांसह समिती कार्यालयात हजर राहावे.
यासाठी समिती कार्यालयात “विशेष त्रुटी पूर्तता मोहीम कक्ष” सुरू करण्यात आला आहे. येथे अर्जदारांच्या त्रुटी दूर करून तातडीने निर्णय घेतला जात आहे. मात्र, अनेक अर्ज अद्याप त्रुटीमुळे प्रलंबित आहेत.
अशा अर्जदारांसाठी २७ मार्च २०२५ रोजी “विशेष कृती कार्यक्रम” आयोजित करण्यात आला आहे. संबंधित अर्जदारांनी जात दावा सिद्ध करणारी महसुली व शालेय कागदपत्रे, अर्जाची पावती यासह
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आय.टी.आय. चौक, एल.आय.सी. रोड कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसुदन धारगावे यांनी केले आहे.

#गडचिरोली #जातवैधता #विशेषकृतीकार्यक्रम #प्रमाणपत्र #त्रुटीपूर्तता #सामाजिकन्याय #शासनसेवा #kunalkamra

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here