ग्रामपंचायत दुर्गापूर येथे घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष सभेच आयोजन

62

The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. ०९ : तालुक्यातील दुर्गापूर ग्रामपंचायत मध्ये घरकुल लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी सरपंच परमेश्वर गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घरकुल लाभार्थ्यांची बैठक घेण्यात आली.
तसेच लाभार्थ्यांनी घराचे लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करावी अशी सूचना या बैठकीत देण्यात आले.
महाराष्ट्र शासनाकडून घरकुल निधी ५० हजार वाढविण्यात आलेले असुन घराचे बांधकाम योग्य प्रकारे करावे. अशा सुचना सर्वांना देण्यात आल्या. कोणताही समस्या उद्भभल्यास त्याची तात्काळ माहिती देऊन ग्रामपंचायत स्तरावर सोडवण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन सरपंच परमेश्वर गावळे यांनी लाभार्थ्यांना दिले.
दुर्गापूर येथील ग्रामपंचायत अधिकारी मीनाक्षी डोहे ह्याची प्रकृती ठीक नसल्याने त्या रजेवर अल्याने त्याठिकाणी कामतळा ग्रामपंचायत चे अधिकारी सय्यद यांनी ग्रामपंचायत दुर्गापूर चा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित सिंधुताई पोटावी उपसरपंच, येसवदाताई टेकाम, मनोज टेकाम, नितीन मडावी, ग्रामपंचायत शिपाई महेश बेसरा, मंगलाताई कड्यामी व सर्व घरकुल लाभार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here