The गडविश्व
गडचिरोली, ५ ऑगस्ट : शासनाने तलाठी साझा पुनर्रचना अहवालाच्या अनुषंगाने नवनिर्मित करण्यात आलेल्या पदावर २० टक्के प्रमाणे तलाठी या पदावर अनुकंपा पदभरती करण्याबाबत कळविलेले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे तलाठी नवनिर्मित साझा करीता पेसा या संवर्गातून अनुकंपा तत्वावर पदभरती करण्यात येणार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोलीचे सामाईक यादीमधील अनुसूचित जमातीचे जे उमेदवार कागदपत्र पडताळणी करीता उपस्थित झालेले नाही त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे शैक्षणिक कागदपत्रासह व पेसा संदर्भात पुराव्यासह उपस्थित राहावे. असे निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांनी कळविले आहे.