The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : ज्या वयस्क लोकांना किंवा लहान मुलांना बोलता येत नाही, बोलताना त्रास होतो, अळखळत बोलणे किंवा बोलताना तोतळल्यासारखे होते, शब्द उच्चार बरोबर येत नाही अशा सर्व प्रकारच्या समस्यांवर सर्च हॉस्पिटल, चातगाव येथे महिन्यातील दर गुरुवारी सकाळी ९ वाजता पासून ते दुपारी १२ वाजेपर्यंत तज्ञांद्वारे उपचार केले जातात.
स्पीच थेरपी ही एक विशेष उपचार पद्धत आहे ज्यामध्ये विशिष्ट उपचार पद्धतीचा वापर करून बोलणे, शब्द उच्चारण, भाषा समजून घेण्याची आणि व्यक्त करण्याची क्षमता सुधारण्यावर विशेष काम केले जाते. त्यामुळे लहान मुलांच्या आणि वयस्क लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये आत्मविश्वास आणि मनोबल वाढण्यास मदत होते.
स्पीच थेरपी उपचारात तोंडाचे व्यायाम, मराठी व इंग्रजी वर्णमाला, गणितातील अक्षरे आणि विविध पद्धतींच्या साह्याने उपचार केला जातो. त्यामुळे इतरांशी संवाद साधण्यात मदत होते. तरी या सेवांचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा आणि आपले दैनंदिन जीवन सुखकर बनवावे असे आवाहन करण्यात येत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews #muktipath )