सर्च रुग्णालयामध्ये मणक्याची तपासणी ओपिडी व शस्त्रक्रिया

96

The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : सर्च रुग्णालय आणि स्पाईन फाऊंडेशन मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने सर्च रुग्णालयमध्ये मणक्याची तपासणी ओपिडी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्या रुग्णांना कंबरेचे दुखणे असून ते दुखणे पायात जाते, चालल्यावर ज्यांना ज्या पायात कमजोरी येते किंवा पायातील दुखणे वाढून थांबावे लागते, मणक्यात ग्याप आहे किंवा मणक्यातली नस चिपकली आहे, ज्यांना मणक्याची शस्त्रक्रिया सांगितली आहे, ज्यांच्या पाठीला वाक आहे, पाठ वाकडी आहे, ज्यांना मानेचे दुखणे आहे आणि हे दुखणे हातात जाते, सतत पाठीमद्धे दुखत असते. अश्या सर्व समस्यांवर दवाखान्यातील रुग्णालयीन दैनंदिन ओपीडीमध्ये (सोमवार ते शनिवार) तपासणी केली जाते आणि ज्या रुग्णांना शस्रक्रियेची गरज असेल अशा रुग्णांची शस्त्रक्रिया भारतातील नामवंत स्पाईन सर्जन डॉ.शेखर भोजरज व त्यांची टिम यांच्याद्वारे ११ ते १३ जुलै २०२४ महिन्यात घेण्यात येणाऱ्या स्पाईन शिबिरात अल्प दरात करण्यात येणार. तरी गरजू रुग्णांनी तपासणी करून स्पाईन शिबिराचा लाभ घ्यावा अशी माहिती संचालिका डॉ. राणी बंग आणि वैद्यकीय अधिकारी दत्ता भलावी यांनी दिली आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath #serchchatgao #serchhospital )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here