संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबीरात १०० पुरुष तर ३ महिला रक्तदात्यांचे स्वयंस्फूर्त रक्तदान

79

The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०१ : संत निरंकारी मिशन दिल्ली शाखा कुरखेडाच्या वतीने आज मंगळवार १ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दूपारी ४ वाजता दरम्यान आयोजित रक्तदान शिबीरात तब्बल १२५ रक्तदात्यानी नोंदणी केली होती यापैकी २२ रक्तदाते वैद्यकीय कारणाने अनफिट ठरल्याने १०० पुरुष तर ७ महिला रक्तदात्यांनी रक्तदान करीत आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली.
मागील सलग १३ वर्षापासून संत निरंकारी मिशन शाखा कुरखेडाच्या वतीने येथे दरवर्षी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. मिशनचे प्रमूख बाबा हरदेव सिंगजी महाराज यांनी रक्त गटारात सांडवण्यापेक्षा रक्तदानाचे पवित्र कार्य करीत अमूल्य जिवनाची रक्षा करा असा संदेश दिला होता. या संदेशाचे पालन करीत निरंकारी स्वंयसेवक दरवर्षी ठिकठिकाणी मोठ्या संख्येत रक्तदान शिबीराचे आयोजन करीत या पवित्र कार्यात सहभागी होतात. आज शिबीराचे उदघाटन निरंकारी मंडळाचे वडसा झोनल इंचार्ज किशन नागदेवे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी कुरखेडा शाखा प्रमूख मुखी माधवदास निरंकारी गडचिरोली क्षेत्रीय संचालक हरिश निरंकारी, भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, काँग्रेस तालुका अध्यक्ष जिवन पाटील नाट, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष राम लांजेवार, नगरपंचायत उपाध्यक्ष बबलू हूसैनी, माजी नगराध्यक्ष रविन्द्र गोटेफोडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकूसरे, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमीत ठमके, नरेंद्रशहा महाराज, डॉ.सतिश गोगूलवार, मोहन मनूजा, नासिर हाशमी, मोनेश मेश्राम, उपप्राचार्य प्रा.किशोर खोपे, डॉ. दशरथ आदे आदि उपस्थित होते. तर शिबीरात जिल्हा सामान्य रूग्नालयातील रक्तसंक्रमन अधिकारी डॉ. अशोक तूमरेटी, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश बोरकर, डॉ.अर्चणा ठलाल, रक्तकेंन्द्र तंत्रज्ञ राहूल सिडाम,पूनम आत्राम, मोहीनी चूटे प्रयोगशाळा तंत्रज्ञ रश्मी मोगरे, मेघा वलथरे, धम्मप्रीया झाडे, ममीता कन्नाके, शुभांगी गहाणे, राधा मोहणे, दिक्षा जोगे,सूरज मोहूर्ले,धिरज खेवले,प्रमोद देशमुख,मोहन राऊत,आनंद नैताम,बंडू कूंभारे, रूपेश जांभूलवार,निखील उंदिरवाडे, विकास कोहचाळे, तूषार हलवादीया यानी सेवा बजावली शिबीराचा यशस्वीतेकरीता सेवादल संचालक दिलीप निरंकारी सेवादल शिक्षक अजय पूस्तोडे व निरंकारी स्वंयसेवकानी सहकार्य केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here