-अवैध दारूविक्रीमुक्त करण्याचा निर्णय
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या बुर्गी (पिपली) येथे मुक्तिपथ व गाव संघटनेच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशीय सघन भेटीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, विविध उपक्रमांसह आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अवैध दारूविक्री विरोधात लढा देण्यासाठी युवक-युवतींनी तयारी दर्शविली.
दुर्गम भागात वसलेल्या बुर्गी (पिपली) येथे मुक्तीपथ व गाव संघटनेच्या वतीने दोन दिवशीय सघन गांव भेटीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान गाव संघटन बैठक, युवा युवती बैठक, गाव ग्राम सभा घेऊन मुक्तिपथ तालुका चमूने गावातील अवैध दारूविक्रीबाबतची सध्यास्थिती जाणून घेतली. सोबतच गावात सुरु असलेली अवैध दारूविक्री बंदीसाठी करावयाच्या उपाययोजना समजावून सांगितले. गाव विकासाठी दारूबंदी का गरजेची आहे. ही बाब मुक्तिपथचे तालुका संघटक किशोर मलेवार यांनी पटवून दिले. सोबतच आपल्या गावातून अवैध दारू हद्दपार करण्यासाठी ग्रामस्थांसह युवकांनी गाव संघटनेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यानंतर स्त्री आरोग्य शिक्षण, आपल्या मुलाना कँसर पासून वाचवा कार्यक्रम यासारखे विविध उपक्रम घेऊन दारू व तंबाखूचे दुष्परिणाम पटवून देण्यात आले. तसेच गावातील रुग्णांना गावातच उपचार मिळावे, यासाठी गाव पातळी व्यसन उपचार शिबीर घेण्याचा ठराव घेण्यात आला. दरम्यान, मुक्तिपथ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला महिला-पुरुष, युवक-युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवित दारूबंदीच्या समर्थनात लढा देण्याची तयारी दर्शविली. या स्पर्धेत युवक गटात प्रथम गणेश नरोटे, द्वितीय रूपेश नरोटे तर पुरुष गटात प्रथम कैचू वेलदा, द्वितीय मादी नरोटे, महिला गटात प्रथम येण्याचा मान मुन्नीताई नरोटे, द्वितीय सुशीला पदा यांनी पटकाविला. यशस्वी स्पर्धकांना दुपट्टा आणि मेडल देवून सन्मानित करण्यात आले. सघन भेट यशस्वी करण्यासाठी दिलीप नरोटे गाव पाटिल, मुन्निताई नरोटे आशा वर्कर, गणेश नरोटे भुमय्या यांनी सहकार्य केले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #serchhospital #muktipath )