विसोरा व आमगाव केंद्रस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

135

– ४ विद्यार्थ्यांची तालुकास्तरावर निवड
The गडविश्व
गडचिरोली, १२ जानेवारी : मुक्तीपथ तर्फे देसाईगंज तालुक्यातील आमगाव आणि विसोरा या दोन केंद्रातील विद्यार्थ्यांची केंद्रस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रथम व द्वितीय आलेल्या चार विद्यार्थ्यांची तालुकास्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रमांतर्गत मुक्तीपथ तर्फे जिल्ह्यातील बाराही तालुक्यामध्ये शाळा तंबाखूमुक्त करणे बाबत शाळा कार्यक्रम घेण्यात येत आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात प्रश्नमंजुषा स्पर्धा देसाईगंज तालुक्यातील जिल्हा परिषदच्या सर्व शाळांमध्ये घेण्यात आली. दुसऱ्या टप्प्यामध्ये केंद्रस्तरावर आमगाव केंद्रामधील आमगाव, सावंगी, गांधीनगर, एकलपूर आणि तुळशी या पाच शाळांनी सहभाग घेतला. यावेळी आमगावच्या सरपंच रूपलता बोदले, यशवंतराव ठाकरे आणि उपसरपंच प्रभाकर चौधरी यांनी परीक्षणची जबाबदारी पार पडली .यावेळी प्रथम क्रमांक सावंगी तर आमगाव शाळेला दुसरा क्रमांक पटकाविला. विसोरा केंद्रामध्ये विसोरा, कसारी , शंकरपूर, चोप या शाळांनी सहभाग घेतला. यावेळी परीक्षक म्हणून गावचे सरपंच रमेश कुथे, उपसरपंच करंकर, माजी सरपंच मंगला देवढगले आणि तालुका संघटनेचे अध्यक्ष तथा माजी पंस उपसभापती शेवंता अवसरे यांनी परीक्षणाची जबाबदारी सांभाळली. या केंद्रामध्ये पहिला क्रमांक जिप शाळा चोप आणि दुसरा क्रमांक बोळधा प्राथमिक शाळेने पटकाविला.
या स्पर्धेनंतर विद्यार्थ्यांनी गीत गायन व नाटक सादरीकरण केले. व्यसनाचे दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त केले. सोबतच दोन्ही केंद्रातून प्रथम व द्वितीय ठरलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला असून त्यांची निवड तालुकास्तरावर करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे नियोजन गट शिक्षणाधिकारी चापले यांच्या समन्वयातून मुक्तिपथ तालुका संघटिका भारती उपाध्याय, अनूप नंदगिरवार, आमगाव, विसोरा केंद्राचे केंद्रप्रमुख गुरनुले, पोटगाव केंद्राचे केंद्रप्रमुख कस्बे, कूरुड केंद्राचे केंद्रप्रमुख मेघराज बुराडे व केंद्रातील सर्व शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले. विशेष म्हणजे या तालुक्यातील एकूण २० जिल्हा परिषद शाळा आणि ३ आश्रम शाळा अशा एकूण २३ शाळेतील १८०२ विद्यार्थ्यांनी ही स्पर्धा दिली होती.

(The Gadvishava) (Gadchiroli News) (Veera Simha Reddy) (Swami Vivekananda Birthday) (HBSE Date Sheet 2023) (PAK vs NZ) (Golden Globes 2023) (Muktipath)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here