राजनगट्टा येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी

346

The गडविश्व
चामोर्शी, ९ डिसेंबर : श्री संताजी सांप्रदायिक महिला मंडळ यांच्या वतीने राजनगट्टा येथे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन गट ग्रामपंचायत वालसराचे सरपंच अरुण मडावी यांनी केले. सहउद्घाटक गणेश कुकूडकर सिंचन विभाग घोट, कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मण वासेकर तमुस अध्यक्ष, दिपप्रज्वलन भाऊजी चलाख, सितारामभाऊ भांडेकर अध्यक्ष तेली समाज राजनगट्टा,वालसरा ग्रामपंचायत सदस्या सौ. मालन लोमेश सातपुते, सौ.दिपाली शेट्ये, सौ.अश्विनी मुलकलवार, शाळा व्यवस्थापन समिती सभापती साईनाथ कोडापे तसेच वसंत कोहळे उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक किशोर कोहळे शिक्षक यांनी संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकले. शिरोमणी संताजी जगनाडे यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ मध्ये पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. विठोबा जगनाडे व आई मंथाबाई हे विठ्ठलभक्त होते. त्यामुळे संताजी वर लहानपणापासून धार्मिक संस्कार झाले. संत तुकारामांचे विश्वासू सहकारी होते. तुकोबारायाचे अभंगगाथा इंद्रायणी नदीत बुडवल्यानंतर पुन्हा लिखाणाचे कार्य संत जगनाडे महाराज यांनी केले. त्यामुळेच तुकोबारायांची गाथा आज सुध्दा वाचता येतो असे प्रतिपादन केले. जिवन सिडाम यांनी संताच्या विचारांना समाजा समाजात न विभागता सर्व समुदायासाठी प्रकाशाचे किरण दाखवणारे होते असे मार्गदर्शन करताना बोलत होते. मुलीचे शिक्षण हेच प्रगतीचे लक्षण.त्यामुळे मुलींना शिकवा त्यांना उच्च शिक्षण घेवू द्या असे प्रतिपादन जितेंद्र कोहळे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन लोमेश सातपुते यांनी केले तर आभार प्रकाश चिचघरे यांनी मानले. कार्यक्रमाला वालसरा, कुंभारवाही, राजनगट्टा येथील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजबांधवांनी मोलाचे सहकार्य केले.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Santaji Maharaj)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here